न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२२) :- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त ओम साई ग्रुप, तापकीरनगर तसेच सोमनाथदादा तापकीर युवा मंचच्या वतीने ” नारी सन्मान सोहळा ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या नारी सन्मान सोहळ्यात पूजा नंदकुमार शिंदे (महाराष्ट्र पोलिस), प्रीती गायकवाड (ब्युटिशियन), डॉ. आरती भारती, वैशाली गवळी (शिक्षिका), प्रेरणा त्रिभवण (परिचारिका), गौरी अहिरे (परिचारिका), सुवर्णा पवार (आशा वर्कर), ऐश्वर्या बागल (फार्मसिस्ट), रुपाली मिसाळ (महिला बचत गट), शिल्पा शिंदे (एनडीएसएफ निधी लिमिटेड), दीपा धारूरकर ( महिला बचत गट) यांचा सन्मान करीत त्यांना गौरविण्यात आले.
महिला या स्वतः घर सांभाळून पुरुषांच्या बरोबरीने आज सर्वच क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या समाजासाठी, देशासाठी अहोरात्र सेवा करीत दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत, महात्मा गांधी जयंतीनिमित्त महिला योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला, अशी माहिती आयोजकांनी दिली.


















