न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०२२) :- साईराज युवा प्रतिष्ठान साईराज सांस्कृतिक मंच पिंपरी चिंचवड शहर विभागाच्या कृतज्ञता अहवालाचे प्रकाशन आज संपन्न झाले. पिंपरी पालिकेचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माधुरी कुलकर्णी, सचिन चिंचवडे , माथाडी महामंडळ सदस्य अनुप मोरे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, सुधिर वाल्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
साईराज युवा प्रतिष्ठान वाल्हेकरवाडी बिजलीनगर परिसरात अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात विविध समजुपयोगी उपक्रम राबवित आहे. परिसरातील शेकडो महिला सदस्य ह्या सामाजिक उपक्रमांशी जोडलेल्या आहेत. अश्या लोकोपयोगी उपक्रमांना सर्व संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधिंच्या मदतीचा सहयोग असतो. वर्षभर सुरू असलेल्या ह्या सर्व उपक्रमांना त्यांची मोलाची मदत होत असते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साईराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप मोरे म्हणाले,” साईराज युवा प्रतिष्ठानचा पिंपरी चिंचवड शहराच्या बदलत्या स्वरूपाच्या जडणघडनित मोलाचा वाटा आहे. हरित पिंपरी चिंचवडसाठी त्यांच्या स्वयंसेवकांनी मोलाची भूमिका साकारली आहे. संस्थेच्या सहभागामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दखल घेतली आहे. कृतज्ञता अहवाल प्रकाशनाला शुभेच्छा.
मोरेश्वर भोंडवे म्हणाले,” वाल्हेकरवाडी रावेत परिसरात पर्यावरण पूरक कार्यक्रम व वृक्षारोपण करण्यासाठी साईराज युवा प्रतिष्ठानचा मोलाचा वाटा आहे.प्रत्येक कार्यक्रमात त्यामुळे मला सहभाग ही घेता येत असतो. त्यांच्या “साईराज सांस्कृतिक मंचास” माझ्या मनःपुर्वक शुभेच्छा.
कार्यक्रमाचे संयोजन गोपाळ चौधरी, प्रशांत शिंपी, नरेंद्र चऱ्हाटे, नितीन किनगे, प्रशांत किनगे,मनोहर पाटील, प्रदीप भदाणे,सुरेश चौधरी,रमेश पिसे, विनायक पाखले,अमित पाटील, गजानन धोटे, अमर देसाई, हरिश्चंद्र गांधेले, महावीर कोठारी, दीपक जमदाडे, ललित बोरा,वसंत निकम,प्रसेन अष्टेकर यांनी केले.


















