- दिघी पोलिसांकडून एकाला अटक; इतरांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- मौजे डुडुळगाव येथील गट नं २३० या मिळकतीमधील फिर्यादी यांच्या मालकीच्या ४४.७५ आर क्षेत्रापैकी २२ आर क्षेत्राचे संगणमताने बनावट कागदपत्रे तयार केले. त्याआधारे अतितातडीची बनावट मोजणी करुन ती खरी आहे, असे भासवुन जबरदस्ताने अतिक्रमण करुन बेकायदेशीररित्या ताबा घेतला.
तसेच या मिळकतीवर फिर्यादी गेले असता आरोपी यांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे सर्व आरोपी यांनी मिळुन फिर्यादीच्या मिळकतीवर अनाधिकृत बोर्ड लावुन त्यावर एक कंटेनर उभा करुन त्यामध्ये एक जोडपे देखील ठेवले. हा प्रकार (दि. ४/१/२०२२ रोजी ते आजपावतो) मौजे डुडुळगाव येथील गट नं २३० या मिळकतीबाबत घडला.
खंडु बळवंत पवार (वय ६२ वर्षे, रा. गोळेवाडी पो. आंबी ता. मावळ) यांनी दिघी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी मारुती डेव्हलपर्स तर्फे सुरेश जयंतीलाल पटेल (रा. एल अॅक्सीस फ्लॅट नं ५०४, बी विंग मोशी), दिलीप किसन पवार, महिला, महिला, महिला आरोपी, राजेश किसन पवार, महिला आरोपी, महिला आरोपी, महिला आरोपी, शिवाजी लक्ष्मण पवार, महिला आरोपी, ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार, महिला आरोपी, तुकाराम लक्ष्मण पवार, महिला आरोपी (सर्व रा. डुडुळगाव ता. हवेली, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मारुती डेव्हलपर्सचे सुरेश जयंतीलाल पटेल यांना अटक करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.