न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२२) :- संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चार पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवून आरोपींनी त्यांच्याकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेतला आणि त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतः ची उपजिवीका भागवित असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.
पोलिसांनी कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यात एक स्वीफ्ट कार, रोख रक्कम, ओपो कंपनीचा मोबाईल, पेनड्राईव्ह असा एकुण ६,१२,१००/- रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिसांनी (दि. ७) रोजी पाच वाजताच्या सुमारास कस्तुरी चौक, हिंजवडी येथील संत तुकाराम मंगल कार्यालय समोरील रस्त्यावर घडली. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे भगवंता चिंधु मुठे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी ऋषिकेश राजाराम पांगारे (वय २४ वर्षे रा. बालेवाडी स्टेडीयम स्वीमींग पुल समोर, हिंजवडी, मुळ पत्ता घाटकोपर मुंबई), पुजा ऊर्फ प्रिया तानाजी कुचेकर (वय ३२ वर्षे रा. श्रीनिवास संकुल सोसा, फलॅट नंबर ५०३, रायगड कॉलनी, न्यु आहिरेगांव वारजे माळवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


















