न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- ” तुम्ही आमची रुम आजच्याआज खाली करायची ” असे म्हणत आरोपी घरमालक आणि त्याच्या पत्नीने फिर्यादी भाडेकरूला धक्का बुक्की केली.
” तु जर आज माझी रूम खाली केली नाही तर तुझ्याकडे पाहुन घेतो ” अशी दमदाटी केली. घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करुन फिर्यादी यांच्या मनास लज्जा निर्माण होईल अशी लैंगिक शेरेबाजी करुन गैरवर्तन केले.
हा प्रकार (दि. ९) रोजी आठच्या सुमारास पांढरकर कॉलनी, मोरेवस्ती, चिखली येथे घडला. ३१ वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी संदीप खरात व त्याची पत्नी नाव माहीत नाही (रा. नायर कॉलनी, साने चौक, चिखली), भाजु पुंडलिक खरात यांच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहे.
















