न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- जागतिक हृदय दिनानिमित्त २९ स्पटेंबर पासून आयोजित हृदयरोग जनजागृती अभियान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळत असून १७ ऑक्टोबरपर्यंत हृदयरोग निदान व उपचार शिबिर आणि जनजागृती अभियान चालणार आहे.
ओम हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे आयोजन ओम हॉस्पिटल मध्ये केले आहे. या शिबिरात पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारकांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत ईसीजी, स्ट्रेस टेस्ट, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया यासह हृदय तपासणी मोफत करण्यात येत आहे आणि हा उपक्रम १७ ऑक्टोबरपर्यंत रबविण्यात येणार असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन डॉ.सुनील अग्रवाल यांनी केले आहे.
तसेच हृदयासंबंधी काहीही तक्रार किंवा प्रश्न असतील तर हृदयरोग जनजागृती अभियान अंतर्गत त्यांना मोफत योग्य मार्गदर्शन दिले जाईल.अधिक माहितीसाठी 91-8888825601 वर संपर्क साधा.
















