न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- ईद ए मिलादची मिरवणुक पाहून फिर्यादी व फिर्यादीचा मित्र दोघेजण मोरवाडी चौकातुन पुणे-मुंबई हायवे रस्त्याने बँक ऑफ इंडीया, आंबेडकर चौक, पिंपरी येथुन चालत जात होते. फिर्यादीच्या समोरुन ३ ते ४ अनोळखी मुले चालत-चालत जवळ आले. त्यावेळी जवळ आलेल्या मुलांनी ” तुम्ही आम्हाला जाताना साईड का दिली नाही ” असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीचा मित्र तिथून पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना, अनोळखी मुलांपैकी एका मुलाने त्याच्या कंबरलेला लावलेला कोयता बाहेर काढला व फिर्यादीच्या हातावर वार केला. त्यावेळी फिर्यादीनी त्यांचा डावा हात मध्ये घातला असता फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगाटवर वार लागुन गंभीर जखम झाली.
ही घटना (दि. ९) रोजी ८.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी फिर्यादी नागेश देवप्पा इरमिट्टी (वय १६ वर्षे, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, गांधीनगर, पिंपरी) यांनी तिन ते चार अनोळखी आरोपींविरोधात पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















