न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२२) :- स्विफ्ट कारची काच दारुच्या नशेत फिर्यादीच्या पतीने फोडून नुकसान केले. त्या कारणामुळे आरोपीने फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ आणि चप्पल फेकुन मारली. तसेच तेथे हजर तिसऱ्या आरोपीने फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. फिर्यादीचे पती हे दारुचे नशेत असताना त्यांना मारहाण केल्यास त्यामध्ये त्यांचा जीव जाईल, याची जाणीव असताना आरोपीने जाणीवपूर्वक त्यांना जोरात लाथ मारली. फिर्यादीचे पती जमिनीवर डोक्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यांचा सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी, त्यांचे पती यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी या आरोपीकडे गेल्या असता आरोपीने फिर्यादी यांना ” तुला काय करायचे आहे ते कर, माझे वर पर्यंत हात आहेत ” असे म्हणत दमदाटी केली. ही घटना (दि. १) रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास गुरुकृपा सोसायटी, मोरेवस्ती, चिखली येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
याप्रकरणी महिला फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी जगदीश जाधव (रा. गुरुकृपा सोसायटी, मोरेवस्ती, चिखली), जगदीश जाधव याची आई (पुर्ण नाव माहिती नाही), मनोज जरे (रा. मोरे वस्ती चिखली) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.















