न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२२) :- ऑफिसच्या लोखंडी शटरला लॉक लावून फिर्यादी घरी गेले असता अज्ञात चोरटयाने ऑफिसचे लोखंडी शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला. ऑफिसमधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील व ऑफिसमधील ६७,५०० रूपये रोख रक्कम, टॅब व हार्ड डिस्कची चोरी केली.
हा प्रकार (दि.६ ते ७ ऑक्टो) रोजी रात्री ९ ते सकाळी १० च्या दरम्यान न्यु नरसिंह मोटार ड्रायव्हिंग स्कुल, कमलराज कॉम्प्लेक्स शॉप नं. ०९, पहिला मजला, दिघी येथे घडला.
फिर्यादी राहुल नारायण कांबळे (वय ३६ वर्षे, रा. शिवपुरम सोसायटी, फ्लॅट नं. ३०१, ताजणे मळा, च-होली बु.) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद फिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.