न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२२) :- मे टेफ्फ प्लास्ट ही फिर्यादी यांच्या मालकीची खाजगी कंपनी असून मे प्रछाया इंजिनीअरींग एंटरप्रायजेस ही आरोपीची खाजगी कंपनी आहे. आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना मोबीया सस्पनेशन कंपनीला पार्टस् सप्लाय करण्याचे कॉन्ट्रक्ट मिळणार आहे, त्यासाठी आवश्यक असणारे प्लास्टिक मोल्डींग मटेरीयलचा तुमच्या कंपनीकडुन पुरवठा करा, त्या मटेरीयलवर आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये प्रक्रिया करुन हे मटेरियल मोबीया सस्पेनशन या कंपनीला पुरवठा करु. मोबीया सस्पेनशन कंपनीसोबत आपल्या दोन्ही कंपन्यांच्या नावे कॉन्ट्रक्ट घेतो, अशी खोटी माहिती दिली.
फिर्यादी यांनी आरोपी यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन आरोपीच्या मागणीप्रमाणे त्याच्या कंपनीला वेळोवेळी प्लास्टिक मोल्डींग मटेरीयलचा पुरवठा केला. फिर्यादी यांनी पुरवठा केलेल्या मटेरियलचा आरोपी यांनी अपहार करुन पुरवठा केलेल्या मटेरियलच्या एकुण किंमतीपैकी ३६,६९,६६६ रुपये रक्कम फिर्यादी यांना न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली.
हा प्रकार सन २०१५ ते डिसेंबर २०१९ दरम्यान मे टेफ्फ प्लास्ट (पत्ता गट नंबर ७८६, पवारवस्ती, चिखली व मे. प्रछाया इंजिनीअरींग एंटरप्रायजेस (पत्ता गट नंबर ८७३, सॉ मिलजवळ, कुदळवाडी, चिखली) येथे घडला. याप्रकरणी फिर्यादी राम वलप्पा चिंचोले (वय ४६, रा. फलॅट नंबर १०१, ओ विंग, तुलसी हाईटस्, सेक्टर ३, तिरुपती बालाजी चौकाजवळ, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी महिला, जगप्पा शरणाप्पा सोली (रा. प्लॉट नंबर १३४, सेक्टर नंबर १८, शिवाजी पार्क, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.















