न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२२) :- पिंपरी- चिंचवड महापालिका प्राशसनाने स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांना सह शहर अभियंतपदी पदोन्नती दिली आहे. त्यानुसार कामकाज वाटपाचे आदेश निगर्मीत करण्यात आले आहेत.
पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर ‘सह शहर अभियंता’ (स्थापत्य विभाग) अभिनामाची पदे शासन मंजूर असून, रिक्त पद पदोन्नतीने भरण्याबाबत दि. १२ ऑक्टोबर रोजी पदोन्नती समिती सभा आयोजित केली होती. या सभेत पदोन्नतीच्या निर्णयाला मान्यता देण्यात आली आणि गुरुवारी शेखर सिंह यांनी पदोन्नतीचे आदेश काढले.















