न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२२) :- रहाटणीतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल येथे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, प्रमुख पाहुणे डॉ. कविता मेसकर (बी.डी. एस) व रवी घोडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकउपस्थित होते. माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम जन्मदिवसानिमित्त शाळेत ‘’मराठी भाषा वाचन’’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अरुण चाबुकस्वार म्हणाले, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला. आपला शेजारी आणि स्वतःला बलाढ्य समजून दादागिरी दाखवणाऱ्या चीनला तोडीस तोड उत्तर देण्याचे आणि वेळ पडल्यास त्याच्याशी दोन हात करण्याची धमक आपल्यात आता आली आहे, त्यात कलाम साहेबांचा सिंहाचा वाट आहे. डॉ. कलाम यांचे विचार देशातल्या मोठ्या राजकारण्यांना तर मार्गदर्शक होतेच शिवाय ते देशातल्या तरुणाईलाही एक प्रेरणास्थान होते. देशातल्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये ते खूप लोकप्रिय होते.
रवी घोडे यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती सांगितली. सूत्र संचालन शिक्षिका सरला शिंदे यांनी केले.