- नऊ जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- चरित्र्याच्या संशयावरुन व माहेरुन मोटार सायकलसाठी पैसे आणण्याच्या कारणावरुन तसेच इतर किरकोळ कारणावरुन वारंवार त्रास देवुन, शिवीगाळ करुन, हाताने मारहाण करुन, धमकी देवुन, शारिरीक व मानसिक छळ करुन फिर्यादी महिलेला क्रूर वागणुक दिली.
हा प्रकार नोव्हेंबर २०२१ पासुन ते आजपावतो नालंदा कॉलनी, पवार किरणा दुकानच्या पाठीमागे, पंचशीलनगर, ता. जि. बीड येथे घडला. महिला फिर्यादी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी पती आकाश संपतराव वाघमारे, (वय २७ वर्षे), सासरे संपतराव भानुदास वाघमारे (वय ६३ वर्ष), सासु (वय ६० वर्ष), दीर स्वप्नील संपतराव वाघमारे (वय ३० वर्ष), चुलत सासरे गौतम भानुदास वाघमारे (वय ५५ अंदाजे), चुलत सासु (वय ४२ वर्ष), मोठे चुलत सासरे भागवत भानुदास वाघमारे (वय ५९ वर्ष), गोविंदराव काळे (वय ६० वर्ष) सर्व रा. नालंदा कॉलनी, पवार किरणा दुकानच्या पाठीमागे, पंचशीलनगर, ता. जि.बीड, प्रकाश दादाराव गवळी (वय ६३ वर्ष रा. मु.पो. पारा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.