न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२२) :- पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आरोपीने पिस्टल व जिवंत राऊंड जवळ बाळगला. पोलिसांना माहिती मिळताच आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून पंचवीस हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे एक पिस्टल व तीनशेचा एक जिवंत राऊंड जप्त केला आहे.
हा प्रकार (दि. १६) रोजी पावणे पाचच्या सुमारास बेंगलोर-मुंबई रोडलगत एस टी स्टॅन्ड जवळ, बावधन येथे घडला. गुन्हे शाखा शस्त्र विरोधी पथकाचे मोहसिन युनुस आत्तार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपी ऋतिक कैलास ऐखंडे (वय २२ रा. एरंडवणे गावठाण, विघ्नहर्ता अपार्टमेंट, प्लॅट नं ५१०, मंत्री हॉस्पीटल जवळ याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली आहे.


















