न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२२) :- दरोडा टाकण्याच्या तयारीतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात शिरगाव येथील महुने गावामध्ये जिवंत काडतुसे खरेदी करण्याकरीता आरोपीच्या साथीदारास पाठवले. तिथे काडतुस न मिळाल्याने, आरोपीने पिस्टल व काडतुसे खरेदी करण्यासाठी जगन सेनानी (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्या मो.क्र. ९१७९२९९०२२ वर फोन पेद्वारे २०,००० रुपये पाठवले. अहमदनगरच्या अमरापुर फाटा येथील पोळ हॉस्पीटलच्या डॉक्टरला शस्त्राचा धाक दाखवुन रोख रक्कम लुटण्याच्या कट रचला. त्यासाठी हॉस्पीटलच्या ठिकाणी जावुन पाहणी आणि नियोजन करून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारी केली, असे निष्पन्न झाले.
हा प्रकार (दि. १६) रोजी साडेआठ ते (दि. १८) रोजी पाच वा. च्या दरम्यान गहुंजे गावातील चौडाई माता मंदिराजवळ घडला. शिरगाव-परंदवाडी पोलीस स्टेशनचे समीर बाळासाहेब घाडगे यांनी शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पुनीतकुमार विवेक शेट्टी (वय २९ वर्षे, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड), आफताब मेहबुब शेख (वय २१ वर्षे, रा. यमुनानगर, वाकड), रूपेश राजेश गायकवाड (वय २१ वर्षे, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), शुभम लक्ष्मण दाते (वय १९ वर्षे, रा. वाल्हेकरवाडी रोड, बळंवत कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड), सचिन बबन जायभाये (वय २४ वर्षे, रा. पुरनाळे गल्ली, भगुर, ता. शेवगाव, जि. अहमदनगर), साहिल हरिदास शिंदे (वय २० वर्षे, रा. म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे.
















