न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२२) :- साहित्यरत्न जैन दिवाकर पू. श्री चौथमलजी म.सा. यांच्या जयंती सप्ताहाचे आयोजन श्री भोसरी जैन श्रावक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये विविध तप साधना आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
जैन साध्वी पू. दिवाकर रश्मी डॉ. सुशीलजी म.सा., मधुर स्वर गायिका पू.साध्वी श्रद्धाजी म.सा. यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संघामध्ये भक्ती,संगीत, आदिनाथ भक्तामर स्तोत्र अनुष्ठान, जैन कुलरक्षिका माता पद्मावती देवी आराधना एकासना उपवास ईत्यादींनी सांगता व कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या चातुर्मास मध्ये आयोजित ४६ वी नवपद आयंबीलओळी मध्ये सुमारे अडीचशे भाविकांनी उपवास सहभाग घेतला होता. आयंबिल ओळीचे आयोजन श्री. धनंजय मुथीयान व सौ पुष्पा मुथीयान परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. माता पद्मावती माता आराधना व्रत मध्ये साठ महिलांनी सहभाग घेतला आहे.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी श्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष राजेंद्र चोरडिया, सुभाष चूत्तर डॉ.जवाहरलाल भळगट, मदनलाल कर्नावट कार्याध्यक्ष सागर साखला गिरीश मुथियान कचरदास गांधी डॉ.प्रदीप गांधी शांतीलाल शाळ नंदलाल लुंकड, प्रमोद चूत्तर,मदनलाल चोरडिया,किरण कटारिया, हस्तीमल गुगळे, विजय पारख, अभय हिरण,मनोज गांधी, आदींनी सहभाग घेतला.


















