न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२२) :- इंस्टाग्राम अकाउंटवर अज्ञात आरोपी (मो. बा. ८३६९६८७०२२) याने फिर्यादी महिलेच्या फोटोचा वापर करुन अश्लिल शब्द वापरून पोस्ट तयार केली. आरोपीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट नंबर satti 7shiv वर ही पोस्ट ठेवली. फिर्यादी महिलेला त्यांच्या नातेवाईकाकडुन याबाबत माहिती मिळाली. फिर्यादीने satti7shiv हे अकाउंट पाहिले असता त्यांच्या नावाचे खोटे अकाउंट तयार केल्याचे त्यांना आढळले. त्यावर अश्लिल फोटो ठेवुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन आरोपीने केले.
फिर्यादीच्या अश्लिल संभाषणाच्या खोटया पोस्ट तयार करून आरोपीने इंस्टाग्रामवर ठेवुन फिर्यादीची व फिर्यादीच्या कुंटूबाची बदनामी केली. फिर्यादी व कुटुंबीयांना फोन उचलण्यासाठी इंस्टाग्रामवरुन धमकी दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२१ ते दि. ०४/१०/२०२२ ते दिनांक दि २९/१०/२०२२ रोजीपर्यंत चिंबळी- कडवली येथे घडला.
३४ वर्षीय फिर्यादी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मोबाईल नंबर ८३६९६८७०२२ व इंस्टाग्रम अकाउंट नंबर satti7shiv वरील अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















