न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ नोव्हेंबर २०२२) :- फिर्यादीचे आरोपी व त्यांच्या मित्रसोबत पूर्वीचे वाद होते. फिर्यादीने त्यांच्या विरोधात पिंपरी पोलिसात यापुर्वीच गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाचा कोरोना काळात मृत्यू झाला. दरम्यान फिर्यादीच्या भाचीच्या साखरपुड्यात आरोपीची पत्नी आली होती. त्यावेळी फिर्यादी मयत आरोपीच्या पत्नीसमोर ” बाबा रणदिवे हा मेला आहे आपल्याला त्याचे काय करायचे आहे तो गेला खड्यात ” असे म्हणाले. ही बाब आरोपीना माहिती झाल्याने ते रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादीच्या घरी गेले व त्यांनी फिर्यादीच्या पत्नीकडे फिर्यादीबाबत विचारना करुन शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या मोटर सायकलवर आरोपीकडे विचारपुस करण्यासाठी गेले असता कोणत्याही कारणाशिवाय आरोपी यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन, लाथा बुक्यांनी मारहाण करुन लोखंडी कोयत्याने डोक्यात, पाठीवर कानावर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी यांना मोठमोठयाने शिवीगाळ करुन हातामध्ये कोयते नाचवून दहशत निर्माण केली.
हा प्रकार (दि. ३/१०/२०२२) रोजी सार्वजनिक शौचालयजवळ, रेल्वे पटरीच्या बाजुला, पत्राशेड झोपडपट्टी, व जलशुध्दीकरण केंद्रासमोरील सार्वजनिक रोडवर, पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड येथे घडला. फिर्यादी सनी ज्ञानु शिरसाठ (वय ३७ वर्षे, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी कपाळया ऊर्फ आकाश काळे, बाळया ऊर्फ विजय काळे, इरफान शेख, सद्दाम, सोहेल व त्यांचे इतर साथीदार, सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही (सर्व रा. पत्राशेड, लिंक रोड, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करीत दोघांना अटक केली आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.