न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२२) :- घरगुती वादातुन आरोपी वडीलाने स्वतःच्या मुलाच्या डोक्यात लाकूड फोडण्याची कु-हाड घालून त्याचा निर्घुण खुन केला आहे. ही घटना (दि. १) तीन वाजेच्या सुमारास सुदुंबरे गावातील फिर्यादीच्या राहत्या घरी, बोरकर वस्ती येथे घडली.
समिर बाळु बोरकर (वय ३४ वर्षे) असे खून झालेल्या मयत मुलाचे नाव आहे. २८ वर्षीय महिला फिर्यादीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी बाळु बबन बोरकर (वय ५५ वर्षे, रा. बोरकरवस्ती, सुदुंबरे) याला पोलिसांनी अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.