न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२२) :- इलेक्ट्रीसिटी अधिकारी असल्याचे सांगून मोबाईल वापरकर्त्याने इलेक्ट्रीक बिल भरण्याच्या बहाण्याने फिर्यादीला Quick Support नावाचे अॅप प्ले स्टोअर्समधुन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यामध्ये ओटीपी भरुन घेण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांची ४८,८०० रुपयांची फसवणुक केली.
ही घटना (दि. २०/०९/२०२२) रोजी साडेतीन ते साडेपाचच्या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी ऑनलाईनद्वारे घडली. फिर्यादी गजानन शामराव पाटील (वय ६३ वर्षे रा. बिल्डींग नंबर ०९, फ्लॅट नंबर १९, श्रध्दा गार्डन, गावडे पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीसात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी स्वतःला इलेक्ट्रीसिटी अधिकारी म्हणवुन घेणारे व मॅसेज करणारे मोबाईल नंबरचे वापरकर्ते याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.