- दिघी पोलिसांकडून महिलांची टोळी ताब्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा सुळसुळाट झाला आहे. मंगळवारी (दि. १) रोजी दिघी-आळंदी रस्त्यावर उभे राहून आरोपी महिलांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरू यांना अडवून अश्लिल हावभाव करीत सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. त्याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत गाडीवरून रस्त्याने जाताना आरोपी महिलांनी फिर्यादीसह इतरांकडे पाहून अश्लिल हावभाव केले. तसेच अश्लिल शब्द उच्चारत फिर्यादीच्या अंगावरुन हात फिरवला. जाणाऱ्या येणाऱ्यांना अडथळा होईल व त्रास होईल तसेच सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल अशी कृत्य केली. ही घटना (दि. १) रोजी दोनच्या सुमारास योगीराज चौक, बस स्टँडजवळील रस्त्यावर, आळंदी येथे घडला. फिर्यादी राहुल मोहन करंजकर (वय ३० वर्षे, रा. सर्वे नं २०१, इद्रायणी हॉस्पीटल मागे, आळंदी-चाकण रोड, आळंदी देवाची) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ३० ते ४० वयोगटातील आरोपी ५ महिलांना ताब्यात घेत त्यांना सीआरपीसी ४१ अ प्रमाणे नोटीस दिली आहे.
दुसऱ्या घटनेत फिर्यादी त्यांच्या मालकीच्या (एम.एच.१४/जी.सी. ३९५३) वाहनातून जाताना रस्त्यावर उभे राहून आरोपींनी फिर्यादीसह इतरांना लैंगिक हावभाव करीत सार्वजनिक सभ्यतेचा भंग होईल असे कृत्य केले. हा प्रकार (दि. १) रोजी १.४५ च्या सुमारास वडमुखवाडी येथील संस्कार ग्रुपच्या इमारत, बोगदयाजवळ दिघी आळंदी रस्त्यावर घडला. फिर्यादी दादासाहेब संभाजी नाळे (वय ४४ वर्षे, रा. धाकटया पादुका मंदीर, पुणे-आळंदी रोड, देवकृपा पेटोलपंपाशेजारी, काळे कॉलनी, चोवीसावाडी) यांनी दिघी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी २५ ते ३५ वयोगटातील चार महिला आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्यांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही घटनांचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.