न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रु.) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची विषेश सभा आज बुधवार (दि. २६) रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड या होत्या.
या बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यात प्रभाग क्र. ११ मधील कुदळवाडी येथील शाळा इमारतीच्या उर्वरीत कामांसाठी १ कोटी ६५ लाख ११ हजार रुपये, पर्यावरण अभियांत्रिकी मैलाशुध्दीकरण केंद्र पंपींग स्टेशनमधील स्काडा सिस्टीमचे देखभाल व दुरुस्तीसाठी १ कोटी ७६ लाख ७२ हजार रुपये, रावेत येथील जलउपसा केंद्र व्ही.टी पंपाची वार्षिक पध्दतीने देखभाल दुरुस्तीसाठी ४५ लाख १३ हजार रुपये,
प्रभाग क्र. १ चिखली उर्वरीत रस्ते डांबरीकरण ४१ लाख ८५ हजार रुपये, प्रभाग क्र. १ म्हेत्रेवस्ती व इतर परीसरातील रस्त्यांचे डांबरीकरण विषयक कामांसाठी १ कोटी ४४ लाख रुपयांच्या खर्चास, मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत ४ नग उदवाहक बसविणेत आले आहेत. त्यांचे देखभाल दुरुस्तीसाठी २ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास, तसेच मनपामार्फत नव्याने बांधन्यात येणा-या जिजामाता पिंपरी, आकुर्डी, मासुळकर कॉलनी इ.रुग्णालयासाठी इटीएफ येणा-या सुमारे ३ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपये. या व अशा इतर विकासकामांच्या तब्बल १४ कोटी ७६ लाख ४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.











