न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रु.) :- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात ‘मराठी राजभाषा दिन’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, मधू दाणी, आशा घोरपडे, स्वाती तोडकर, बिसमिल्ला मुल्ला, श्रद्धा देशमुख, नीलिमा नायडू आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रथम कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन मुख्याध्यापिका गीता येरूणकर व हर्षा बाठिया यांच्या हस्ते झाले. त्यांनी मराठी भाषेची महती विशद केली. मराठी भाषेचा इतिहास स्नेहा बोरले यांनी मांडला. वि.वा.शिरवाडकरांविषयी माहिती साक्षी शिर्के यांनी, तर मराठी भाषेचे महत्त्व गौरी सत्वधर, निलम मेमाणे, स्वाती गाडे यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टीक बंदी’ हे पर्यावरणावर आधारीत जनजागृतीपर नाटक सादर केले. तसेच विद्यार्थ्यींनींनी ‘मंगळागौर’ द्वारे मराठी संस्कृतीचे दर्शन घडविले. याबरोबरच म्हणींवर आधारीत प्रश्नमंजूषाही घेण्यात आली. पाचवीतील श्रेया खाडे हिने लघुनाटीका सादर केली. तसेच आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी रंगासाथीया हे नाटक सादर केले. यामध्ये सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
सूत्रसंचालन आदित्य पवार, सृष्टी आणि सावनी या विद्यार्थ्यांने, तर आभार प्रणाली पाटील यांनी मानले.











