न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- बांधकाम साईटवरील पार्किंगमधून चोरट्यांनी ३,५०,००० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. लोखंडी मुंडे, प्रॉप्स, सिकंजा, युज्या, टायर रॉड, अॅकरनट या वस्तूंचा त्यात समावेश आहे.
ही घटना (दि. १०) रोजी सायंकाळी ७.०० वा ते (दि. ११) रोजी सकाळी ६.३० वा चे सुमारास एक्झारबिया सिंन्गा, नविन बांधकाम साईट येथील बी विंगमधिल पार्किंगमधुन डीवाय पाटील जवळ, च-होली येथे घडली.
फिर्यादी तानाजी राम जाधव (वय ३२ वर्षे, रा. तनिष्क पर्ल, च-होली फाटा, च-होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















