- बोलण्याच्या बहाणा करीत तरुणाच्या गळ्यातील चेन हिसकून आरोपीचा पोबारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- तुला ” मोबाईल रिचार्जवर गिफ्ट म्हणुन फ्रिज आणि गाडी मिळाली आहे ” असे फिर्यादीच्या पाठीमागुन मोटार सायकलवरून आलेला आरोपी अनोळखी इसम फिर्यादीला म्हणाला. बोलण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या गळयातील १,८० ,००० रुपये किमतीचे अं. साडेचार तोळे वजनाची गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने जोरात हिसका मारुन चोरुन नेली.
हा प्रकार (दि. १४) रोजी दुपारी ४.३० वा चे सुमारास शेंडे हॉस्पीटल समोर, भेळ चौक, सिध्दुनगर, सेक्टर नं २५, प्राधिकरण निगडी येथे टर्नवरील गटारीजवळ घडला.
आरोपी राकेश जसाराम सोहेल (वय १८ वर्षे, रा. एबीसी जंक्शन, एच १६, फलॅट नं ५, आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ, से नं २६, आकुर्डी) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी आरोपी एफ झेड सारख्या दिसणा-या निळया रंगाच्या मोटार सायकलवरील अनोळखी इसम (वय अं २५ ते ३०) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















