- मोशीतील प्रस्तावित न्यायालयाच्या भूमिपूजनासाठी न्यायमूर्तींकडे मागितला वेळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारणीने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे, न्यायमूर्ती माधव जामदार, पुणे जिल्हा प्रमुख न्यायधीश एस.सी चांडक यांची भेट घेतली. नेहरूनगर यथील नवीन न्यायालयाच्या उद्घाटना संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले.
मोशी येथे प्रस्तावित न्यायालयाच्या भूमिपूजनासाठी न्यायमूर्ती साहेबांची वेळ मिळावी, अशी मागणी त्यावेळी त्यांच्याकडे केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच स्वतः न्यायमूर्ती हे नेहेरूनगर येथील न्यायालयाची पाहणी करतील आणि उद्घाटनासंदर्भात तारीखही निश्चित करतील, असे आश्वस्त करण्यात आले.
याप्रसंगी उमाप सर, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे मा. अध्यक्ष विलास कुटे, ॲड दिनकर बारणे, महाराष्ट्र व गोवा नोटरी अध्यक्ष ॲड.अतिष लांडगे, पिंपरी चिंचवड ॲड बार असोसिएशनच्या उपाध्यक्षा ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सभासद ॲड. मंगेश खराबे उपस्थित होते.