न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ ऑगस्ट २०२६) :- भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खराळवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी बहल यांनी देशाच्या एकता, विविधता आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व सांगत स्वातंत्र्यसैनिक व देशासाठी योगदान देणाऱ्या महामानवांचे स्मरण करण्याचे आवाहन केले.
यावेळी अकबर मुल्ला, राजेंद्र पवार, सचिन गायकवाड, अविनाश कुलकर्णी, महेश माने, राजू भीमा लोणके, दीपक कार्की, गणेश ताम्हाणे, राम खरात, ज्ञानेश्वर भालेकर, आकाश शेंडे, अमोल कदम, धनराज सूर्यवंशी व अमित थोरात यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
कार्यक्रमास योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, कविता आल्हाट, सीमा सावळे, फजल शेख, विजय लोखंडे, सारंग कामतेकर, सतीश दरेकर, शेखर काटे, वर्षा जगताप, विक्रांत लांडे, राजेंद्र जगताप, निकिता कदम, सविता आसवानी, अथर्व कोकणे, कैलास बारणे, ॲड. सचिन औटे, ॲड. गोरक्ष लोखंडे, ज्ञानेश्वर कांबळे, शेरबहादूर उर्फ मायला खत्री, कविता खराडे, संगीता कोकणे, तुषार ताम्हाणे, विशाल काळभोर, दीपक साकोरे, रवींद्र ओव्हाळ, युवराज पवार, श्रीकांत कदम, युसुफ कुरेशी, संग्राम चव्हाण, प्रशांत महाजन, दत्तात्रय जगताप, अरुण पवार, शक्रुल्ला पठाण, संपत पाचुंदकर, तुकाराम बजबळकर, प्रवीण गव्हाणे, महेश झपके, बाळासाहेब पिल्लेवार, अंकुश दिघे, नवनाथ डफळ, काळुराम खेडकर, गोरोबा गुजर, लहू तोरणे, रवींद्र सोनवणे, बापू सोनवणे, जहीर उर्फ छोटू खान, महेश किर्वे, उदय कुलकर्णी, महेश माने, प्रा. संतोष भांगे, शहाजी आतकर, भाग्यश्री मस्के, नीलम कदम, देवी थोरात, क्षमा सय्यद, स्वराज शिंदे, इमरान शेख, अविनाश सोनवणे, उदय ववले, सुनील जाधव, रमजान सय्यद, धनाजी तांबे, सुनिल अडागळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


















