न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ ऑगस्ट २०२६) :- अनुसूचित जातीतील आरक्षणाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी १८ ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जनआक्रोश महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समितीतर्फे चिंचवड स्टेशन येथील आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून सकाळी १० वाजता मोर्चाला सुरुवात होऊन निगडी तहसील कार्यालयासमोर सांगता होणार आहे.
५८ जातींचे प्रतिनिधी तसेच मातंग, वाल्मिकी, वडार व मादिगा समाज सहभागी होणार आहेत. सरकारने तातडीने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी समितीने केली.
पत्रकार परिषदेला आमदार अमित गोरखे, बापू घोलप, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अनिल सौंदडे, ॲड. सुशील मंचरकर, नेताजी शिंदे, गणेश लोंढे, गणेश अवघडे, भारत विटकर, मारुती पंदरी, मनोज तोरडमल, मयूर जाधव, संदीप जाधव, चंद्रकांत लोंढे, मारुती जाधव, अविनाश शिंदे, बाबासाहेब रसाळ, बाबासाहेब पाटोळे, अरुण जोगदंड, संजय ससाने, नितीन घोलप, सुनील भिसे, सुरज कांबळे, आशाताई बापू वाघमारे, कृष्णा साबळे, शहाणे भानुदास नेटके, भगवान शिंदे, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, शिवाजी साळवे, सतीश भवाळ, अविनाश लोणारी, संजय एडके, राजू आवळे, विठ्ठल झिंजुर्डे, नाना कांबळे, भाऊ कसबे, मारुती सोनटक्के, सागर कापसे, प्रसाद केसरे, स्वप्नील वाघमारे, मयूर घोलप, शंकर खवळे, ऋषी वाघमारे, शिवाजी खडसे, महादेव आडागळे, योगेश लोंढे आदी उपस्थित होते.


















