न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२२) :- कासारवाडी येथील जैन श्रावक संघाच्या वतीने (दि. १९) रोजी प्यारीबाई पगारिया सभागृहात श्रमणसंघीय सलाहकार प पू दिनेशमुनिजी म सा, प पू दीपेंद्रमुनिजी, म सा, प पू पुष्पेंद्रमुनिजी म सा, जिनशासन प्रभाविका प पू दर्शनप्रभाजी म सा, प पू अनुपमाजी म सा, आदि ठाणा ६, प पू प्रियदर्शनाजी म सा इदि ठाणा ३ ,प पू पूण्यस्मिताजी म सा आदि ठाणा २ अशा एकुण १४ साधु साध्वींच्या मंगलमय सान्निध्यात हा त्रिवेणी संगम कार्यक्रम पार पडला.
यावेळी नवकार महामंत्र जाप करण्यात आला व प पू प्रमोदसुधाजी व प पू मुक्तिप्रभाजी म सा यांच्या जीवनचरित्रावर प पू प्रणीधीजी, प पू ईशदर्शनाजी, प पू जिनेश्वराजी,प पू प्रियदर्शनाजी आणि प पू दिनेशमुनिजी म सा यांचे प्रवचन झाले. त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सोनाली बागमार, अशोक बागमार, सुरेश गदिया, सागर सांकला, पी एम जैन, दिलीप भन्साळी आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
कासारवाडी संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रास्ताविक केले. निवर्तमान अध्यक्ष संदीप फुलफगर यांनी आभार मानले आणि डॉ अशोककुमार पगारिया यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी कासारवाडी, दापोडी, पिंपळे गुरव, चिंचवडगाव, चिंचवड स्टेशन, आकुर्डी, भोसरी येथील भाविक मोठ्या संख्येने हजर होते.