न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- धनादेशचा दुरुपयोग करून चुलत्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुतण्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरी येथे घडला. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदय भाऊसाहेब वाघेरे (रा. पिंपरीगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
उदय याने त्याचे चुलते सुधीर वाघेरे यांच्या धनादेशाचा दुरुपयोग करून खात्यावरील ३४ लाख आठ हजार स्वतःच्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेत फिर्यादीच्या वडिलांची आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या वडिलांच्या खात्यावरील दोन कोटी ९९ लाख ७० हजार रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्स्फर करून घेत इतरांच्या खात्यावर वळविले.
यामध्ये फिर्यादीच्या वडिलांची तसेच फिर्यादी व त्यांचे भाऊ चेतन वाघेरे यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार मार्च २०१० ते जानेवारी २०१३ या कालावधीत पिंपरीतील पवना बँकेत घडला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.