- तरून गंभीर जखमी; काळेवाडीतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- घरासमोरील भिंतीच्या वादावरुन शेजारील आरोपी फिर्यादीच्या मावशीसोबत भांडण करत होते. फिर्यादी या भांडणाचा व्हिडिओ काढत असताना आरोपींपैकी एकाने फिर्यादीला ढकलले. फिर्यादीसह त्यांचा मोबाईल खाली पडला, त्यानंतर आरोपींपैकी काहींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यापैकी एकाने फिर्यादीला नाकावर बुक्का मारल्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त आले. त्यामुळे नाकास दुखापत झाली. तसेच आरोपीने पोटात लाथ मारली, तेथील आरोपी महिलांनी देखील फिर्यादीचे केस ओढले.
ही घटना (दि. २२/१०/२०२ रोजी ३:३० वा. च्या सुमारास) विजयगनर, अल्फोसा शाळेजवळ, काळेवाडी येथे घडली. २३ वर्षीय महिलेने वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी दिपक मिस्तरी (वय ३६ वर्ष अंदाजे), महिला आरोपी (वय ३६ वर्ष), राजेश मिस्तरी (वय ३८ वर्ष), विद्याधर मिस्तरी, महिला आरोपी (वय ५२ वर्ष), महिला आरोपी (वय ३२ वर्ष), महिला आरोपी (वय ३० वर्ष), महिला आरोपी (वय ४० वर्ष), महिला आरोपी (वय २३ वर्ष), नाना पाटील (वय ५५ वर्ष), अक्षय पाटील (वय ३० वर्ष), रामामिस्तरी (वय ३६ वर्ष), महिला आरोपी (वय ५० वर्ष), बाबु मिस्तरी (वय ३६ वर्ष) सर्व रा. विजयगनर, अल्फोसा शाळेजवळ, काळेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















