- मुलाच्या आईची पोलिसात धाव; आठ जण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२२) :- संगणमत करून आरोपींनी गैर कायदयाची मंडळी जमवली. फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा (वय १६ वर्षे) यास जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्याला मोटार सायकलवरून उचलून तळेगाव दाभाडे येथील भेगडे आळी समोरील रिकाम्या मैदानात नेले. तिथे त्याला शिवीगाळ करीत शस्त्राचा धाक दाखवीत लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्या अवघड जागेवर काठीने टोचवून त्याच्या खिशातील पॉकीट व त्यामधील १५०० रुपये व आधारकार्ड चोरून नेले. कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी देत दहशत निर्माण केली.
ही घटना ऑक्टोबर २०२२ (निश्चित तारीख वेळ माहित नाही) या दरम्यान तळेगाव दाभाडे येथे घडली. ३८ वर्षीय महीला फिर्यादी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपी अक्षय गायकवाड, प्रथमेश आगळे, यश गरुड उर्फ मॉनस्टर (पुर्ण नाव माहित नाही), विणु धुमाळ, धिरज बनसोडे, पण्या उर्फ प्रणव चांदणे, आर्यन गरुड (छोटा बांडी), रोशन लोखंडे, पैलवान उर्फ अतुल सोनवणे, विशाल वर्मा (सर्व रा. तळेगाव दाभाडे) व २ ते ३ इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील आठ जणांना अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.