न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- किरकोळ भांडणाच्या रागातून आरोपीने फिर्यादीचा मेहुणा पप्पु कनोजिया याला मारहाण केली होती. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेले होते. दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटावर चाकू मारला. तसेच सह आरोपी याने फिर्यादीच्या डोक्यात गॅस सिलेंडर मारुन त्यांना गंभीर जखमी केले.
ही घटना (दि. २५) रोजी रात्री १२. १५ वा. चे दरम्यान लेबर कॅम्प, शेडगे वस्ती, वाकड येथे घडली. फिर्यादी राजकपुर बच्चुलाल कनोजिया (वय ४२ वर्षे, रा. महाराष्ट्रनगरी, रहाटणी फाटा, गजानननगर, काळेवाडी) यांनी आरोपी प्रशांत महादेव शेडगे (वय २१ वर्षे, रा. लेबर कॅम्प, शेडगे वस्ती, वाकड), प्रदिप मिनानाथ कदम (वय २१ वर्षे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना ताब्यात घेतले आहे.