न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ नोव्हेंबर २०२२) :- हिरो प्लेजर या टु व्हीलर (एमएच १४ ईडब्ल्यु ५९५५) वरुन फिर्यादीची बहिण घरापासून प्रतिभा इंटरनॅशनल स्कुल, चिंचवड या शाळेत मुलाला सोडवण्यासाठी जात होत्या. कुदळवाडी ते केएसबी चौकाकडे जाणा-या रोडवर, शाहुनगर बस स्टॉप सिग्नल जवळ वॅगनर गाडी (एमएच १४ जीडी ९५४२) वरील चालकाने टु व्हीलरला धडक दिली.
हर्षदा आळणे व त्यांचा मुलगा अथर्व असे दोघेजण रोडवर पडल्याने पाठीमागुन आलेल्या ट्रक (जीजे ०३ डब्ल्यु ८०१०) वरील चालकाने मुलगा अथर्व याच्या अंगावरुन ट्रकचे मागील चाक घातले. त्यातच मुलाचा मृत्यु झाला. या अपघातामध्ये हर्षदा आळणे यांच्या डाव्या डोळयावर जखम झाली असुन, टु व्हीलरचे नुकसान झाले आहे.
फिर्यादी गोरक्षनाथ बबन पोकळे (वय ३९ वर्ष, रा. प्लॉट नंबर १०३, ड्रीम पार्क, निघोजे) यांनी आरोपी सुल्तान अहमद हबीब अहमद (वय १९ वर्षे रा. इरागीगुल, ता पतरगंदी, जि. करीमगंज, आसाम), केसुभाई गोविंदभाई सरबय्या (वय ३५ वर्षे, रा. नवागाव, दिवेलिया झोपडपट्टी स्मशानभुमी जवळ, राजकोट, गुजरात) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
















