न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२२) :- मैत्रिणीसह फिर्यादी या पायी फिरत असताना एक अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला. तुमच्या आधाकार्डच्या नबंरवर १ लाख ७५ हजार रुपयांची लॉटरी लागली आहे आणि सोबत एक स्कुटी आहे, ते सर्व माझ्या ऑफिसवर भरपुर दिवसापासुन पडुन आहे, तुम्ही माझ्या सोबत चला, मी ते तुम्हाला देवुन टाकतो, असे सागितले.
फिर्यादीला मोटरसायकलवर बसवुन नेत फिर्यादीच्या गळयातील ७०,००० रुपये किमितीची सोन्याची चैन व मनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिस्कावुन चोरी करुन नेले.
हा प्रकार (दि. २६) सायं ५.३० वा. च्या सुमारास शिवाजी विदयालय समोरील कोहली गॅस एजन्सी, आंबेडकर नगर, देहुरोड येथे घडला. ७५ वर्षीय वृद्ध महिलेने आरोपी अज्ञात इसम (वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे















