न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- बो-हाडेवाडी, मोशी येथील पेठ क्रमांक १४ मध्ये ६.५७ हेक्टर जमिनीवर न्यायालय प्रस्तावित आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी सोमवारी (दि. २७) या जागेची पाहणी केली. तसेच नेहरूनगर, पिंपरी येथील न्यायालयाच्या इमारतीला भेट दिली. जानेवारीमध्ये उद्घाटन झाल्यानंतर या इमारतीमध्ये न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती ए. एस. डॉक्टर व पुणे जिल्हा प्रमुख न्यायाधीश एस. सी. चांडक, न्यायाधीश शिंदे यांनी बोऱ्हाडेवाडी येथील जागेची पाहणी, जागेचा लेआऊट, बांधकाम नकाशा पाहिला. त्याबाबत बार पदाधिकाऱ्यांशी न्यायमूर्तींनी चर्चा केली. योग्य त्या सूचनादेखील केल्या. नेहरूनगर येथे न्यायालयाच्या विस्तारीकरणांतर्गत तयार झालेल्या न्यायालयीन इमारतीची पाहणी केली. जानेवारीमध्ये या इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
मोरवाडी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आर. एस. वानखेडे, न्यायाधीश आर. एम. गिरी, न्यायाधीश एम. जी. मोरे, न्यायाधीश पी. सी. फटाले, एन. आर. गजभिये, पिंपरी- चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, ॲड. प्रमिला गाडे, ॲड. मंगेश नढे, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. प्रशांत बचूटे, ॲड. अक्षय केदार,ॲड. सुशील मंचरकर, ॲड. विलास कुटे, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. सुदाम साने, ॲड. दिनकर बारणे, ॲड. अतिष लांडगे, लक्ष्मण येळे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल सदस्य ॲड. राजेंद्र उमाप उपस्थित होते.