न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- अज्ञात व्यक्तीने त्याच्या मेल आयडीवरुन फिर्यादीच्या कंपनीचा ईमेल आयडी (ybhosekar@maestro control.com) यावर ACA Pacific technologys pte Itd company सिंगापुर या कंपनीचे बँक खाते बदलले.
Novo banco, SA बँक खाते क्रमांक PT50 ००७ ०००० ००५९ ०७१० २१३२३ स्पीफ्ट कोड क्रमांक एक SCPTPL या खात्यावर कंपनीचा विश्वास संपादन करुन व्यवहारापोटी देणे असलेले ३७,७५,००१.४५ (यु एस डॉलर ४६,०९०) रक्कम पाठविण्यास सांगितले. ती टीटी रेमीटन्स याव्दारे स्विकारुन कंपनीची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली.
ही घटना (दि. १७) रोजी दुपारी ४. ११ वा ते (दि. २९) रोजी सकाळी १०.३० वा. चे दरम्यान Maestrotek Innovations pvt ltd company, पत्ता बी ४०६, तिर्थ टेक्नोस्पेस, सर्व्हे नं १०३, बाणेर येथे (दि. १/१२/२०२२ रोजी १.३७ वा. घडला. फिर्यादी सुनिल एरणकर (वय ३५ वर्षे, रा. फ्लॅट नं एफ-५०९, स्पेस एलेना सोसायटी, बावधन, पुणे) यांनी आरोपी [email protected] या इमेल धारकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.