- वाकड पोलीसांकडून एजंट जेरबंद; तरुणीची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- पिडीत २४ वर्षीय मुलीच्या गरिबीचा गैरफायदा घेत आरोपीने पिडीतेला पैशांचे अमीष दाखवले. वेश्या व्यवसायासाठी गोंदीया येथून पुण्यात बोलावुन घेतले. गि-हाईकांना व्हाटसअॅप कॉल आणि एजंटशी संगनमत करुन ओला कॅबमधुन हॉटेलमध्ये वेश्यागमनासाठी पाठवले. पिडीते कडुन वेश्याव्यवसाय करून घेतला.
कमाईतील अर्ध्यापेक्षा जास्त रक्कम आरोपीने स्वतः घेवुन उपजीवीका भागवली. आरोपीने त्याच कमाईतील पैसे एजंटला व इतर खर्चासाठी ठेवून घेतले. हा प्रकार (दि. ३०/११/२०२२) रोजी द्पारी ३.१५ वा.चे सुमारास, बिर्ला हॉस्पीटल समोरील तुरीया होमटेल हॉटेल, थेरगाव येथे घडला.
महिला फिर्यादी हीने वाकड पोलीस ठाण्यात आरोपी प्रसाद उर्फ गोविंद शिवलाल भुरतेल (वय ४१ वर्षे, रा. पेईंग गेस्ट हाऊस, हिंजवडी, मुळ रा. माईल ११, मेघालय, गुवाहाटी, आसाम), सुबिन (मो.नं. ७६३८०८६३५६) व गुन्हयाच्या तपासात निष्पन्न होणारे इतर अज्ञात इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी एकाला अटक केली असून आरोपीच्या ताब्यातुन ५०,००० किमतीची अॅक्टीवा, दोन मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण ८८,००० रु. किं. मुद्देमाल जप्त केला आहे.