न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ डिसेंबर २०२२) :- अज्ञात चोरटयाने बिल्डींगच्या जिन्याचे गेटचे लॉक तोडुन बिल्डींगमधील फिटींग केलेल्या वायरी जागोजागी तोडुन खोडसाळपणे नुकसान केले. तब्बल २६,५०० रु किं ची फिनोलेक्स कंपनीची वायर घरफोडी करुन चोरुन नेली आहे.
ही घटना (दि. २९/११/२०२२) रोजी १०.०० वा. ते (दि. ३०/११/२०२२) रोजी सकाळी ९.०० वाजताचे दरम्यान काटे कॉलनी नंबर ५, श्री फणसे महाराज मठाचे शेजारी, आळंदी येथे घडली.
फिर्यादी दिपक दत्तात्रय कुंभार (वय ४८ वर्षे, रा. ठि. बी. १२, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.