न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- व्हॉट्सअपवर आरोपी अनोळखी व्यक्तीने लिंक पाठवली. फिर्यादीने त्या लिंकवर क्लिक केले. तिथे फिर्यादीच्या नावाचे Musne१२ हे अकाउंट तयार झाले. त्यावर वेगवेगळ्या टास्कद्वारे फिर्यादीचे पैसे पेटीएमने ट्रान्सफर करुन घेत नफा देण्याचे अमिष दाखवले.
लिंक धारक, लिंक बनवणाऱ्या इसमांनी फिर्यादीची तब्बल २,५३,००० रुपयांची अर्थिक फसवणुक केली. हा प्रकार (दि.१०/०६/२२ ते दि.१२/०६/२०२२) फिर्यादीच्या घरी घडला.
फिर्यादी स्वप्नील विलास मुसणे (वय २६ वर्षे, रा. वेदांत बंगलो, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर) यांनी मोबाईल (९००७१८५०८१) क्रमांकधारक व (www.tmt591.in/public/reg/yqm/664307) लिंकधारक आणि लिंक बनवणाऱ्या इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.