न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ डिसेंबर २०२२) :- काळया-लाल रंगाच्या डिओ (एम.एच.१२/पुर्ण क्रमांक माहीत नाही) स्कुटीवरून आरोपी तिघेजण फिर्यादीच्या जवळ आले. फिर्यादी पिकअप (एम एच. १४ सी.पी.५१५९) टेम्पो चालवीत होते. दरम्यान ‘ टेम्पो आमचा आहे ‘ असे म्हणत आरोपींनी फिर्यादीला ढकलून दिले.
फिर्यादीचा १,५०,००० किंमतीचा पिकअप टेम्पो व ५०,००० किंमतीचे २४५ रिकामे मालाचे कॅरेट असा एकुण २००,००० किंमतीचा माल आरोपींनी जबरदस्तीने नेला. ही घटना (दि. १) गुरुवारी रोजी रात्री ११,०० वा. सुमारास तळवडे चौक, देहुगाव येथे घडली.
फिर्यादी गणेश आसाराम पुले (वय २२ वर्ष, रा भोंडवे चाळ, सागर डेअरीच्या मागे, शिंदे वस्ती, रावेत, मुळगाव डोंगरगाव, ता. पाथरी, जि. परभणी) यांनी आरोपी अज्ञात तीन इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.