- पोलीस स्टेशनच्या आवारातच महिलेचा विनयभंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथील नाना-नानी पार्क जवळील रस्त्यावरून फिर्यादी चालत होत्या. तेव्हा आरोपीने फिर्यादीच्या पाठीमागे येत मोठयाने आवाज दिला. ” थांब तुला लय माज आलाय काय? माझ्याविरुद्ध पोलीसांकडे तक्रार करती का; आता तुला सोडणार नाही, तु आता चल माझ्याबरोबर लॉजवर ” असे बोलत फिर्यादीच्या हाताला धरून ओढु लागला.
फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करीत, फिर्यादीचा विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. ३) रोजी दुपारी १.०० वा. घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी वैभव विटे (रा. तळेगांव दाभाडे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















