न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- सार्वजनिक ठिकाणी आप-आपसात भांडण तंटा केला. पोलीस स्टाफ व फिर्यादी यांनी आरोपींना समजावुन सांगितले. त्या दरम्यान फिर्यादी यांचा आदेश न जूमानता आरोपींनी पोलीस स्टाफसमोरच झोंबाझोंबी करीत भांडण तंटा वाढविला.
हा प्रकार (दि. ३ रोजी) रात्री ९.०० वा चे सुमारास पाईट, ता. खेड येथील नवखंडेनाथ मंदीरासमोर, सार्वजनिक ठिकाणी घडला. फिर्यादी चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक यांनी दिनेश शंकर रौंधळ, ओंकार विष्णु रौंधळ, रूतिक लक्ष्मण रौंधळ, अनिकेत शंकर खेंगले, अतुल सुनील खेंगले, सोमनाथ विष्णु रौंधळ, (सर्व राहणार पाईट) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पाच जणांना अटक केली आहे.















