न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ मार्च) :- पिंपळेगुरव व बोपखेल ही दोन गावे एकसमान आहेत, पिंपळे गुरवचा विकास ज्या प्रमाणे झालेला आहे, त्याच प्रमाणे बोपखेलचाही विकास भविष्यात होणार आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यानी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. ४ दिघी बोपखेल येथे उभारण्यात येणा-या ५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मैलाशुध्दीकरण केंद्राचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव होते.
आज शनिवार (दि. २) रोजी झालेल्या या कार्यक्रमास ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, नगरसदस्या सिमा सावळे, निर्मला गायकवाड, नानी ऊर्फ हिराबाई घुले, नगरसदस्य विकास डोळस, लक्ष्मण उंडे, माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले, माजी नगरसदस्य भाऊसाहेब सुपे, सारंग कामतेकर, सह शहर
अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता संजय भोसले, यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
५ एमएलडी क्षमता असलेल्या मैलाशुध्दीकरण प्रकल्पास सुमारे ५ कोटी २२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून, मार्च २०२० अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. यामुळे बोपखेल परिसरातील जलनिसारण सुविधा विकसित होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.











