- प्रेमिकेसोबत घरोबा करण्यासाठी त्याने केला स्वतःच्याच मृत्यचा बनाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- प्रेमसंबंध असलेल्या महिलेसोबत लांब कोठेतरी जावून राहण्याकरीता आरोपीने खुन करण्याच्या उद्देशाने फिर्यादीचे वडील यांना सुभाश ज्ञानोबा थोरवे यांच्या शेतामध्ये नेले. स्वतःच्या मुत्यूचा बनाव करण्यासाठी फिर्यादीचे वडील रविंद्र भिमाजी घेनंद (वय ४८ वर्षे) यांचे डोके कोयत्याने मानेपासून वेगळे केले.
त्यानंतर आरोपीने त्याच्या अंगावरील कपडे फिर्यादीचे मयत वडील यांच्या अंगावर घालून त्यांना रोटरमध्ये घालून फिरवले. अपघाताचा तसेच स्वतःच्या मुत्यूचा बनाव रचत फिर्यादीच्या वडीलांच्या अंगावरील कपडे, डोके, कोयता कोठेतरी लपवून ठेवून फिर्यादीच्या वडीलांचा खुन करून पुरावा नष्ट केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १६) रोजी रात्री ९.३० ते १०.३० वा चे दरम्यान मौजे च-होली खुर्द, ता. खेड, जि पुणे येथे घडली. फिर्यादी निखील रविंद्र घेनंद (वय २८ वर्ष, सध्या रा. मानसी प्रेसिंग कंपनी जवळ, धानोरे, ता. खेड) यांनी आरोपी सुभाष उर्फ केरबा छबन थोरवे (वय ६५ वर्षे रा. च-होली खुर्द, ता खेड, जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.















