न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- ‘ तुम्हाला माझ्या कंपनीमध्ये काम देतो ‘, असे सांगून आरोपीने फिर्यादी महिलेला मोबाईलवर फोन करून एका ठिकाणी बोलावून घेतले. आरोपीने फिर्यादी यांना त्याच्या पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर बसवून लॉजवर नेले.
आरोपीने फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध निर्माण केले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २३) रोजी सकाळी ११.१० वा ते दुपारी १.०० वा. पर्यंत सान्वी लॉज, आळंदी रोड, दिघी येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी प्रदिप अनंतराव दिघे (वय ५७ वर्षे, रा. गायकवाडनगर, दिघी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.















