न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- जांबवडे गावचे फिर्यादी हे ग्रामसेवक आहेत. साक्षीदार तुषार आनंदा भोसले हे ग्रामपंचायत शिपाई आहेत. फिर्यादीच्या सांगण्यावरुन जांबवडे गावच्या पाण्याच्या टाकीजवळ गायरान जागेतील पटंगणातील कचरा उचलण्याचे सरकारी काम जे.सी.बी व डंपरच्या सहाय्याने साक्षीदार करीत होते.
सायंकाळी ५.०० वा. काम बंद करण्याची वेळ झाल्याने आरोपीने साक्षीदार यांना ‘ उशिरापर्यंत कचरा उचलण्याचे काम चालु दे, तुझ्या काय बापाचे जाणार आहे ‘ अशी दमदाटी केली. बॅटने ग्रामपंचायत शिपायाच्या हाता पायावर व पाठीत मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २१) रोजी सायंकाळी ५.०० वा. मौजे जाबंवडे, ता. मावळ येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी सचिन आनंदा शिंदे (रा. जांबवडे, ता. मावळ) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















