न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- वन विभागात वनरक्षक म्हणुन फिर्यादी नियुक्तीस आहेत. ते टिंबर मार्टमध्ये सॉमिल चेक करण्याचे शासकिय कर्तव्य बजावत होते. दरम्यान आरोपीने ते शासकिय काम करु नयेत म्हणून फिर्यादीला धमकमावुन त्यांच्या अंगावर जाऊन त्यांची कॉलर पकडली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २६) रोजी सकाळी ११.२० वा चे सुमा. जलाराम टिंबर मार्ट, पदमजी पेपर मिल समोर, थेरगांव येथे घडला.
फिर्यादी वनरक्षक (नियत क्षेत्र अधिकारी) पांडुरंग हरीभाऊ कोपनर (वय ३० वर्षे) यांनी आरोपी अरुण भगवान यादव (रा. रिहेगाव, ता. मुळशी, जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















