न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- बांधकाम चालू असताना त्याकरीता लोखंडी सेंट्रींगच्या प्लेट आणल्या होत्या. आरोपीने ५१,००० रुपये किमतीच्या एकूण ८५ प्लेटा चोरून नेल्या. या प्लेटा रिक्षा (एम.एच.१४ जी सी ७४९९) तसेच इतर एका अनोळखी रिक्षा (नंबर माहित नाही) यातुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी चोरी करुन नेल्या आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २१) रोजी रात्री १:३० ते १:१५ तसेच (दि. २३) रोजी १२:३० ते २:०० वा. चे दरम्यान एम. जी. बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्स, विकासनगर, देहुरोड येथे घडली.
फिर्यादी रोहण रमेश तोरणे (वय ३६ वर्षे, रा. सिध्दीविनायक प्रस्थ बिल्डींग, सरस्वती सी- २, फ्लॅट नंबर -२, गणेश तलाव शेजारी, सेक्टर नंबर २६, निगडी प्राधिकरण यांनी आरोपी रिक्षा तसेच इतर एका अनोळखी रिक्षा यातुन आलेल्या तीन अनोळखी इसम (नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















