न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२२) :- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला आरोग्यास घातक अपायकारक गुटखा, पान मसाला, तंबाखुजन्य पदार्थ आरोपींनी जवळ बाळगला. या अपायकारक पदार्थ सेवनाने मुखाचे कर्करोग व इतर विकार होऊन शारिरीक हानी होऊ शकते, हे माहित असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपीने हे कृत्य केले.
पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असुन आरोपीकडून ११,००० रूपये किंमतीचा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ व ७०,००० रु किंमतीची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा (एम. एच. १४ एच.एल. ५२३४) जप्त केली.
ही कारवाई (दि. २६) रोजी दुपारी ४.१५ वा. चे सुमारास रंगाज हॉटेल समोर, हरीओम स्विटजवळ, दिघी रोड, भोसरी येथे केली. भोसरी पोलिसांनी आरोपी बेताराम रामाजी चौधरी (वय ५८ वर्षे, रा. गव्हाणे यांची बिल्डींग, साईसिध्दनगर, आदर्श शाळेजवळ,दिघी रोड, भोसरी) याला अटक केली असून पाहिजे आरोपी दिनेश खेताराम चौधरी (वय २४ वर्षे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
















